इंद्रधनुष्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चित्र:इंद्रधनुष्य.jpg
आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य
इंद्रधनुष्याच्या निर्मितीची मीमांसा

इंद्रधनुष्य म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील बाष्पकणांवर / दवबिंदूंवर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन होऊन प्रकाशाचा वर्णपट दिसण्याची वातावरणीय, प्रकाशीय घटना आहे. हा वर्णपट धनुष्याकृतीप्रमाणे दिसतो. या वर्णपटात बाहेरील कडेस तांबडा व आतील कडेस जांभळा रंग दिसतो.

क्वचित प्रसंगी मुख्य इंद्रधनुष्याबाहेर पसरलेले, फिक्या रंगांतील व मुख्य इंद्रधनुष्याच्या वर्णपटाच्या उलट्या क्रमाने रंग दाखवणारे (जांभळा बाहेरील कडेस व तांबडा आतील कडेस असणारे) दुय्यम इंद्रधनुष्यही दिसते.

इंद्रवज्र[संपादन]

संपूर्ण गोलाकार इंद्रधनुष्याला इंद्रवज्र असे म्हणतात. इंद्रवज्र क्वचित आणि फक्त काही भौगोलिक ठिकाणीच दिसते. प्रत्येक इंद्रधनुष्य हा पूर्ण गोल "इंद्रवज्रच" असतो. पण क्षितिजामुळे आपल्याला तो अर्धगोल दिसतो. पावसाचे थेंब कसे , कुठल्या दिशेने, त्यातले अंतर आणि किती वेगात पडत आहेत यावर इंद्रधनुष्याचे पूर्ण गोलाकार दिसणे अवलंबून असते. इंद्रवज्राचे वैशिष्ट्य असे, की जो हे दृश्य पाहतो; तो स्वतःलाच त्यात पाहतो. पाहणा-याचे डोके बरोबर मध्यभागी दिसते.